‘आता घरोघरी सोलकढी ‘
कोकणातील अप्रतिम चव थेट तुमच्या घरी..
अगदी माफक दरात…
किंमत फक्त ३० रुपये (२०० ml )
घरपोच सेवा… ( ६ ग्लास’च्या ऑर्डर’वर )
नारळाच्या दुधापासून…आगळ–कोकम पासून बनलेली, जिभेवर रेंगाळणारी..
अहा ..!! व्वा..आणणारी..
चविष्ट रुचकर अशी सोलकढी.. व्हेज असो वा नॉन व्हेज, कधी – केंव्हाही चालणारी..
मनाची क्षुधा शांती करणारी..पाटेकरांची..घरगुती सोलकढी…
सोलकढी च्या नावातच soul आहे त्यामुळे तिचे फायदे सांगत बसण्यात काही अर्थ नाही..
तिला घटा घटा घशाखाली घालून क्षुधाशांती केल्यावरच तिचा अर्थ कळू लागतो.
कोकमांनी सोडलेला रंग नारळाच्या दुधात मिसळून त्या दुधालाही प्रेमात पाडतो आणि लाजून हलकाच गुलाबी होतो.
मिरची आणि लसणाची जोडी त्यांच्या आयुष्यात खरी चव आणतात आणि तयार होते सगळे प्रॉब्लेम सॉलव्ह करणारी अप्रतिम सोलकढी…
झणझणीत जेवण झालं कि घरात सोलकढी ही व्हायलाच हवी नाही का…
मग कधी देता आहात थंडगार सोलकढीची ऑर्डर ?
क्षुधाशामक अशी सोलकढी..
मनात ठेवत नाही कुठलीच अढीपित्त असतो वा डोकेदुखीत्यावर एकच रामबाण उपाय गुलाबीसर कोकमाची पाटेकरांची घरगुती चविष्ट सोलकढी..
एकदा पिऊन तर पहा नक्कीच म्हणाल अरे वा…!!
– अमृता संभूस
घरोघरी सोलकढी | Solkadhi Special